घरात घुसलेल्या भल्या मोठ्या नागाला तरुणीने सहज गुंडाळलं, … VIDEO पाहून अंगावर येईल काटा.Snake Viral Video

Snake Viral Video: सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी प्रचंड व्हायरल होतात, ज्यात अगदी माणसांपासून ते प्राण्यांपर्यंतचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमुळे आपल्या अंगावर काटा येतो. आता असाच आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. दरम्यान, आता या व्हिडीओनंतर आणखी एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका भल्या मोठ्या नागाला तरूणी रेस्क्यू करताना दिसतेय.

लाडक्या बहिणींना e-KYC केली तरीही ₹१५०० कायमचे बंद होणार, नेमकं कारण काय ? समोर आली अपडेट.Ladki Bahin Yojana EKYC List

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये भल्या मोठ्या नागाला पकडण्यासाठी तरूणी आली असून यावेळी ती नागाला रेस्क्यू करते. परंतु अचानक तिच्या हातातून नाग सटकतो आणि जमिनीवर पडतो. यावेळी तरूणी मोठ्या चपळतेने आणि संयमाने नागाची शेपटी पकडते. यावेळी नाग तरूणीवर हल्ला करण्याचा प्रयत्नही करतो परंतु शेवटी तरूणी त्याला सुखरूप जंगलापर्यंत घेऊन जाते आणि त्याला सोडून देते.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shweta_wildliferescuer या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत नऊ लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “अंगावर काटा आला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बापरे किती भयानक”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूपच मोठा नाग आहे.”

युतीची घोषणा!, चर्चेच्या टेबलावर फक्त 52 जागांचा प्रस्ताव; शिंदेंना जबर धक्का बीजेपी लढवणार राहणार एवढ्या जागा.BMC Election 2025

Leave a Comment