बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी, दहावीची २० फेब्रुवारीपासून राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर.SSC HSC Board Exam Time Table 2026

SSC HSC Board Exam Time Table 2026:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.

भाऊबीजेच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुशखबर, महायुती सरकारचा मोठा निर्णय, 1500 चा हप्ता जमा Ladki Bahin Yojana 21th Insttalment Deposit

तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या

प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश आहे. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. त्याची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होईल.

भररस्त्यात, साप आणि मुंगूसामध्ये तुफान राडा… पुढे असं काही घडलं; पाहून उडेल थरकाप.. VIDEO तुफान व्हायरल.Viral Video

शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही त्यात समावेश आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेच्या प्रात्यक्षिक, लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment