Teacher Dance Viral Video: आजकालच्या शालेय शिक्षणात आणि पूर्वीच्या शालेय शिक्षणात जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक पाहायला मिळतो. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे.
परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात केवळ मुलांनी अभ्यास करून यश मिळवावं हाच हेतू असायचा. परंतु, बदलत्या काळानुसार आता शाळेत मुलांचे छंद, कला, आवड-निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते. त्यामुळे अनेकदा शिक्षकही वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर नाचताना, गाणी गाताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
राज्यातील गायरान जमिनी वरील अतिक्रमण हटविणेबाबत शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय Land Record Update
सध्या घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात एक शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांसह गणपतीच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शिक्षिका शाळेच्या समोरच्या परिसरात विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी शिक्षिकेचे लहान विद्यार्थीही तिला उत्तम साथ देतात. त्यांचा हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @arpita_lucky या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास सात लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारों लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “खूप भारी डान्स.” आणखी एकानं लिहिलंय, “आमच्या वेळी असे शिक्षक का नव्हते?” आणखी एकानं लिहिलंय, “खूप छान ताई”. पुढे एका व्यक्तीनं लिहिलंय, “असे शिक्षण प्रत्येक शाळेत असायला हवे.”