Teacher Dance Viral Video:आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा क्षण कधी लोकांच्या मनात घर करून बसेल हे सांगता येत नाही. कधी एखादा लहानसा व्हिडीओही मोठा संदेश देऊन जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत कोणताही अभिनेता, सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएंसर नाही, तर एक साधी, सोज्वळ महिला शिक्षिका आहे. तिनं आत्मविश्वास आणि आनंदी स्वभावानं सगळ्यांची मनं जिंकली आहेत. सध्या हिट होत असलेल्या ‘शरारत’ या गाण्यावर तिनं केलेला डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.
हा व्हिडीओ एका कार्यक्रमाचा आहे. स्टेजवर एक महिला शिक्षिका उभी आहे आणि समोर प्रेक्षक बसलेले आहेत. कार्यक्रमात ‘शरारत’ हे गाणं वाजतं आणि ते ऐकताच शिक्षिका स्टेजवरच डान्स करायला सुरुवात करते. कुठलाही संकोच नाही, कुठलीही भीती नाही. फक्त मोकळेपणानं नाचत ती आपला आनंद सगळ्यांसोबत शेअर करते.
व्हिडीओमध्ये शिक्षिकेच्या डान्स स्टेप्स पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. तिचे हावभाव, स्टेप्स आणि एनर्जी इतकी छान आहे की, ती प्रोफेशनल डान्सर वाटावी, असाच परफॉर्मन्स देते. तिच्या प्रत्येक स्टेपमध्ये आत्मविश्वास दिसून येतो.
समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत, शिट्या मारत तिचं कौतुक करताना दिसतात. काही जण व्हिडीओ शूट करीत आहेत, तर काही जण तिचा उत्साह दुप्पट करीत आहेत. सगळं वातावरण आनंदी आणि सकारात्मक झालेलं दिसतं.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच काही तासांतच तो व्हायरल झाला. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी शिक्षिकेचं मनापासून कौतुक केलं आहे. एका युजरनं लिहिलं, “शिक्षक असावा तर असा” तर दुसऱ्यानं म्हटलं, “अशा शिक्षकांमुळेच मुलांना आत्मविश्वास मिळतो.” काहींनी तर असंही म्हटलं, “नोकरी काहीही असो, छंद जपायलाच हवेत.”
हा व्हिडीओ फक्त मनोरंजन करत नाही, तर एक महत्त्वाचा संदेशही देतो वय, पेशा किंवा समाजाच्या चौकटी कला व्यक्त करण्यापासून कोणालाही थांबवू शकत नाही. मनात आनंद असेल, तर तो नाच, गाणं किंवा कुठल्याही रूपातून व्यक्त करता येतो आणि ही शिक्षिका त्याचं सुंदर उदाहरण ठरली आहे.