नविन सेवानिवृत्तीवेतन योजना ( NPS ) लागु करणाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना ( UPS ) विकल्प सादर करणेबाबत GR निर्गमित दि.25.08.2025 UPS Pension Scheme 2025

UPS Pension Scheme 2025:नवीन सेवा निवृत्ती योजना (NPS) लागू असलेल्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी Unified Pension Scheme (UPS) करिता विकल्प सादर करण्याबाबत,

शासन परिपत्रक केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने NPS (National Pension Scheme) लागू असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना UPS (Unified Pension Scheme) चा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यांसदर्भात दि.२०.०१.२०२५ ची अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

तसेच पेंशन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), नवी दिल्ली यांनी दि.१९.०३.२०२५ व २६.०६.२०२५ च्या अधिसूचनेद्वारे पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण, (NPS अंतर्गत UPS योजनेचे परिचालन) नियम, २०२५” जारी केले आहेत. त्यानुसार UPS योजना दि.०१.०४.२०२५ पासून अंमलात आली असून दि.३०.०९.२०२५ पर्यंत केंद्र शासकीय अधिकाऱ्यांना UPS निवडण्याबाबतचे विकल्प सादर करावयाचे आहेत.

२. या अनुषंगाने महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील (IAS/ IPS/ IFOS) ज्या अधिकाऱ्यांना NPS लागू आहे त्यांना Unified Pension Scheme (UPS) मध्ये सहभागी व्हावयाचे असल्यास, त्यांचे विकल्प खालील पद्धतीने सादर करावेत:-

(अ) विकल्प सादर करण्याबाबतचे नमुने:

(१) दि.०१.०४.२०२५ रोजी शासन सेवेत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील (अ.भा.से.) अधिकाऱ्यांनी “पेन्दशन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण, (NPS अंतर्गत UPS योजनेचे परिचालन) नियम, २०२५” च्या परिशिष्ट-१ मधील नमुना A२ मध्ये (प्रत सोबत) विकल्प सादर करावा.प्रसे-१५२५/प्र.क्र.१४५/२०२५/भाप्रसे-३

(२) नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या व दि.३१ मार्च, २०२५ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या अखिल भारतीय सेवेतील (अ.भा.से.) अधिकाऱ्यांनी वर नमूद केलेल्या नियमाच्या परिशिष्ट-१ मधील नमुना B2 मध्ये (प्रत सोबत) विकल्प सादर करावा.

(३) उपरोक्त (१) किंवा (२) प्रमाणे विकल्प देण्यापूर्वी मृत्यू झालेल्या नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या पात्र अखिल भारतीय सेवेतील (अ.भा.से.) अधिकाऱ्यांच्या वैवाहिक जोडीदाराने वर नमूद केलेल्या नियमाच्या परिशिष्ट-१ मधील नमुना B6 मध्ये (प्रत सोबत) विकल्प सादर करावा.

(ब) विकल्प सादर करण्याची कार्यपद्धतीः

अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांचे विकल्प खालील कार्यपद्धतीनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांकडे दि.२९.०९.२०२५ पर्यंत सादर करावेत.

(१) भा.प्र.से. अधिकारी यांनी विकल्प नमुना A2/ B2/ B6 व्यवस्थितरित्या भरुन त्यावर स्वाक्षरी करुन “सहायक संचालक (लेखा), भाप्रसे-३. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२” यांच्याकडे विशेष दूताकरवी अथवा पोस्टाने पाठवावेत.

(२) भा.पो.से. अधिकारी यांनी उदाहरण A/B2/B6 कायम भरुन

त्यावर स्वाक्षरी करुन “सहायक संचालक, भापोसे कक्ष, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई ३२” यांच्याकडे विशेष दूताकरवी अथवा पोस्टाने पाठवावेत. सहायक संचालक, भापोसे यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले विकल्पाचे नमुने त्यावरील तपशील योग्य असल्याचे अग्रेषित पत्राद्वारे प्रमाणित करुन “सहायक संचालक (लेखा), भाप्रसे-३, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे एकत्रितपणे दि.३०.०९.२०२५ पर्यंत सादर करावेत व त्याची एक प्रत स्वतःच्या अभिलेख्यात जतन करावी.

(३) भा.व.से. अधिकारी यांनी विकल्प नमुना A2/B2/ B6 व्यवस्थितरित्या भरुन त्यावर स्वाक्षरी करुन “सहायक संचालक, भावसे कक्ष, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई ३२” यांच्याकडे विशेष दूताकरवी अथवा पोस्टाने पाठवावेत. सहायक संचालक, भावसे यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले विकल्पाचे नमुने त्यावरील तपशील योग्य असल्याचे अग्रेषित पत्राद्वारे प्रमाणित करुन “सहायक संचालक (लेखा), भाप्रसे-३. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे एकत्रितपणे दि.३०.०९.२०२५ पर्यंत सादर करावेत व त्याची एक प्रत स्वतःच्या अभिलेख्यात जतन करावी.

३. वरीलप्रमाणे प्राप्त झालेले अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे UPS चे विकल्प सहायक संचालक (लेखा), भाप्रसे-३. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांनी स्कॅन करुन Protean CRA (NSDL) यांचेकडे ई-मेलद्वारे दि.३०.९.२०२५ पर्यंत सादर करावेत.

४. दि.०१.०४.२०२५ किंवा त्यानंतर अखिल भारतीय सेवेमध्ये (अ.भा.से.) रुजू झालेल्या किंवा होणाऱ्या अधिकाऱ्यांनी, त्यांना Unified Pension Scheme मध्ये सहभागी व्हावयाचे असल्यास, त्यांनी नमुना AI मध्ये (प्रत सोबत) सद्यःस्थितीत NPS च्या नोंदणीसाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी.

५. उपरोक्तप्रमाणे ज्या पात्र अ.भा. से. अधिकाऱ्यांचे Unified Pension Scheme मध्ये सहभागी होण्यासाठीचे विकल्प विहित मुदतीत प्राप्त होणार नाहीत, त्यांना पूर्वीप्रमाणेच NPS (National Pension System) लागू राहील.

६. यासंदर्भात PFRDA यांचेकडून पुढील कार्यवाहीबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

७. सदर परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५०८२५११२७१२०२०७ असा आहे. सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment