Viral video: अनेक जण मस्त वाटतं, शरीर मोकळं होतं यासाठी मसाज घेतात. सलूनमध्ये जाऊन मसाजसाठी पैसे खर्च करतात. कधी कधी तर खूप पैसे खर्च करुन लोक फिजियोथेरपीही घेतात. मात्र हे आपल्यासाठी किती योग्य आहे याचा विचार करत नाही. तसेच अनेकांना सारखी मान मोडायची सवय असते. सलूनमध्ये दुसऱ्याच्या हातूनही हे मान मोडून घेतात. मानेच्या शीरा मोकळ्या करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनेकजण हे वारंवार करतात. अशाच एका महिलेला फिजियोथेरपीस्टकडून मानेच्या शीरा मोकळ्या करु घेणं चांगलाच महागात पडलंय. अवघ्या ५ सेकंदात काही कळायच्या आतच या महिलेचा जागीच मृत्यू झालाय.हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला बेडवर बसली आहे, आणि एक व्यक्ती महिलेच्या मानेला काहीतरी करताना दिसत आहे. सुरुवातीला ही महिला तिला रिलॅक्स वाटतं असल्यासारखे एक्स्प्रेशन देत आहे, हसत आहे. त्यानंतर अचानक ही माहिला मागे पडते, दोन वेळा तिचं शरीर थोडं हलतं आणि त्यानंतर ती श्वास सोडते. अवघ्या पाच सेंकदाच्या मृत्यूचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. चुकीच्या पद्धतीने मानेची नस दाबल्यानं या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ कुठल्या शहरात घडला हे स्पष्ट झालेले नाही, पण सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेकजण सलूनमध्येही मसाज घेत असतात, मात्र यावेळीही चुकीच्या ठिकाणी दाबल्याने स्ट्रोक येऊ शकतो. स्ट्रोक म्हणजे लकवा किंवा अटॅक. मेंदूपर्यंत रक्त पुरवणारी धमनी जेव्हा फाटते तेव्हा व्यक्तीला अचानक स्ट्रोक येऊ शकतो. स्ट्रोक हा प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये आढळून यायचा; पण गेल्या काही दशकांपासून तरुण-प्रौढ मंडळींमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, सध्या समोर आलेलं प्रकरण चिंता वाढवणारं आहे.
अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की, डोकं दाबल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो का? उत्तर आहे, होय. चुकीच्या ठिकाणी दाबल्याने मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो; ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा