बापरे! बास्केटबॉलची प्रॅक्टीस करताना खेळाडूच्या थेट छातीवर पडला पोल; तडफडत राहिला पण क्षणात गेला जीव, CCTV VIDEO समोर.Viral video

Viral video: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कधी कोणती वेळ येईल आणि मृत्यू कवटाळेल सांगू शकत नाही.. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे यामध्ये हरियाणाच्या रोहतक जिल्हयात एका खेळादरम्यान अशी दुर्घटना घडली, ज्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला. इथे एक नॅशनल लेव्हलचा खेळाडू सराव करताना एका अपघाताचा शिकार ठरला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

मिळालेल्या माहितीनुसार बास्केटबॉल कोर्टमधील अपघातात मृत्यू झालेल्या हार्दिकचं वय फक्त १६ वर्ष होतं. तो लखन माजरा येथील खेळाच्या ग्राउंडवर बनलेल्या बास्केटबॉल कोर्टवर एकदा प्रॅक्टिस करत होता. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रामणे बास्केटबॉल कोर्टमधील रिंग असलेल्या लोखंडाच्या पोलवर तो लटकला तेव्हा अचानकपणे पोल सरळ त्याच्यावर पडला. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसतंय की बास्केटबॉल कोर्टवरील तो पोल हार्दिकच्या छातीवर पडला. पोलचं वजन भारी असल्याने हार्दिक ते उचलू शकला नाही आणि तडफडत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जवळच सराव करणारे इतर खेळाडू त्याच्याकडे धावत आले आणि त्यांनी हार्दिकच्या छातीवर पडलेला लोखंडी खांब काढायला सुरुवात केली. या अपघातानंतर हार्दिकला ताबडतोब रोहतकमधील पीजीआय रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @SachinGuptaUP नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलं “फार वाईट..आता त्याच्या पालकांची काय अवस्था असेल याचा विचारही करवत नाही” तर आणखी एकानं “असा मृत्यू कुणाच्याच वाट्याला नको’ ” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment