Mapc Schedule 2026:महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा, निकालाचा महिना याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहीतकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आल्याचे एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ५ ते ९ मे रोजी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार असून, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला जाणार आहे. १६ मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे.
वीज वितरणाचे खासगीकरण, फक्त हे 3 पर्याय निवडता येणार. Privatization of electricity distribution
या दोन्ही परीक्षांचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १७ मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे, तर परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२६मध्ये जाहीर करण्याचे नियोजन आहे.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२५अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ७ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२६ अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होऊन ऑगस्टमध्ये निकाल
जाहीर केला जाणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परीक्षेचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे.
संबंधित वेळापत्रक अंदाजित असून, परीक्षेच्या प्रस्तावित दिनांक, महिना यात कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवडपद्धत याबाबतचा तपशील एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून तो वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा