जीवन-मरणाचा जीवघेणा संघर्ष! हरणावर हल्ला करण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावला सिंह; VIDEO पाहून उडेल थरकाप.Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिंह एका हरणाची शिकार करण्यासाठी जंगलात वाऱ्याच्या वेघाने धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

BMC Election Reservation 2025: मुंबई महापालिकेसाठीची सोडत जाहीर, अनुसूचित जाती, अजासाठी कोणते वॉर्ड राखीव ? पाहा यादी

हिंस्र प्राणी आपली भूक भागविण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांना ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, तोही आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतं. त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांतानं शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते; तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो.

थंडीसाठी खास ट्रिक, घरातल्या पाण्याच्या टाकीतलं पाणी राहील गरम-सकाळी गारठणार नाहीत हातHow To Keep Tank Water Hot

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सिंह शिकारीच्या शोधात असताना अचानक त्याला हरणाचा कळप दिसतो. त्यामुळे तो क्षणाचाही विलंब न करता त्यातील एक लहान हरणाचा पाठलाग करतो. यावेळी हरिणदेखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळण्याचा प्रयत्न करते. परंतु पुढे जाऊन सिंह त्याची शिकार करतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @kilofact-en या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

 

Leave a Comment