लाडक्या बहिणींनो हा कागद अंगणवाडीमध्ये द्या अन्यथा तुमचे 1500 रुपये बंद.Ladki Bahin Yojana New Document

Ladki Bahin Yojana New Document:लाडक्या बहिणींनो, तुमचे ₹1500 बंद होऊ नयेत म्हणून ही अतिशय महत्त्वाची माहिती नीटक्या लक्षाने वाचा!

महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणाच्या सुधारासाठी आणि निर्णयक्षमता मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण’ योजना संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक मदत जमा केली जाते. त्यामुळे ही योजना महिलांसाठी मोठा आधार बनली आहे.

देसी जुगाड थंडीत अंघोळ करण्यासाठी तरुणाची शक्कल, लाखो वेळा पाहिला गेला Video. Desi Jugad Water heating Video

या योजनेचा लाभ सतत मिळत राहावा यासाठी लाभार्थी महिलांचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने Aadhaar आधारित e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. सुरुवातीला e-KYC करण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु काही जिल्ह्यांमधील नैसर्गिक आपत्ती, तसेच अनेक महिलांना त्यांच्या पती किंवा वडिलांच्या मृत्यूमुळे Aadhaar OTP न मिळण्याची अडचण निर्माण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांची e-KYC बाकी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.

ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने मोठा दिलासा देत e-KYC करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. नवीन अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची e-KYC प्रक्रिया अद्याप बाकी आहे, त्यांनी ही संधी गमावू नये.

Farmers Loan Forgiveness | शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्जमाफी?: सहकारी सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू

योजनेअंतर्गत अशा महिला ज्या स्वतः विधवा आहेत, घटस्फोटित आहेत किंवा त्यांच्या वडिलांचे निधन झाले असून त्यामुळे पती/वडिलांच्या नावाने Aadhaar OTP मिळू शकत नाही, त्यांनी आपले e-KYC स्वतः करणे आवश्यक आहे. तसेच त्यानंतर पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र, किंवा न्यायालयाचा आदेश यापैकी आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकेकडे ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी जमा करणे बंधनकारक आहे.

योजनेअंतर्गत अशा महिला ज्या स्वतः विधवा आहेत, घटस्फोटित आहेत किंवा त्यांच्या वडिलांचे निधन झाले असून त्यामुळे पती/वडिलांच्या नावाने Aadhaar OTP मिळू शकत नाही, त्यांनी आपले e-KYC स्वतः करणे आवश्यक आहे. तसेच त्यानंतर पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्रघटस्फोट प्रमाणपत्र, किंवा न्यायालयाचा आदेश यापैकी आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकेकडे ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी जमा करणे बंधनकारक आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment