Aai Loan Scheme 2025:आई कर्ज योजना 2025 अंतर्गत महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून १५ लाख रुपये कर्ज मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती लागते? अर्ज कोठे करावा? कर्ज मिळविण्याची प्रोसेस कशी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
आई कर्ज योजना २०२५ अंतर्गत महिलांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाच्या वतीने संबंधित महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
याचा अर्थ महिलेला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागणार आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यन्त वाचा.
आई कर्ज योजनेचे स्वरूप
पर्यटन विभागाकडून आई कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या संदर्भात दिनांक १९ जून २०२३ रोजी शासनाने जी आर देखील काढलेला आहे. हि योजना महिला केंद्रित असल्याने या जी आरमध्ये दिलेल्या निर्देशानुसार केवळ महिलांनाच आई कर्ज योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी पर्यटन विभागाकडून पात्र महिलांना १५ लाख रुपये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
महिलांना स्वावलंबी बनविणे हा या योजनेमागील शासनाचा उद्देश आहे. ज्या ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत अशा ठिकाणी होमस्टे हॉटेलस किंवा चारचाकी घेवून टूर आणि ट्रॅव्हलचा बिसनेस महिला करू शकतात.
या योजनेमध्ये अनेक उद्योग करता येतात या संदर्भातील उद्योगांची यादी खाली देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवसायाची नोंदणी करावी लागते.
आई योजना कर्ज 2025 व्याजदर आणि अटी
महिला जर होमस्टे, हॉटेल, रेस्टॉरंट टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी इत्यादी व्यवसाय करत असतील तर त्यांना मान्यता प्राप्त बँकामार्फत घेतलेल्या 15 लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची शासन महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करते.
व्याज परतावा जमा करणच्या खालील तीन कंडीशन आहेत.
पूर्ण कर्ज फेड होईपर्यंत व्याजाची रक्कम १२ टक्के च्या मर्यादेत बँकेत जमा केली जाते.
७ वर्षे कालावधीसाठी योजना राबविली जाते.
जास्तीत जास्त ४.५० लाख रुपये व्याज शासन भरू शकते.
बॅंक खात्यात पूर्णपणे कर्जाची परतफेड किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाचे रक्कम ४.५० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जो आधी घडेल तोपर्यंत दरमहा व्याज जमा करण्यात येते.
बँक ऑफ बडोदा कडून मिळवा 5 लाख रुपये कर्ज, अशी करा प्रोसेस. Bank Of Baroda Personal Loan