Maharashtra Police Bharti 2025:महाराष्ट्र राज्य पोलिसदलामध्ये एकूण १५,३०० पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्हा पोलिस दलात शिपाई आणि बँड्समन ही पदे भरली जाणार आहेत. शासनस्तरावरून पदभरती प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रम अजून प्राप्त झालेला नाही.
रिक्त जागांचा अहवाल जिल्हा पोलिस प्रशासनाने गृह विभागाकडे पाठविला आहे. त्यावरून आत पुढची तयार केली जाणार आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्याने ही भरती काही दिवस लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत. यातून भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अवधी मिळणार आहे.
Mrutyupatra : मृत्युपत्र म्हणजे काय? ते का व कसे करावे? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया
जिल्ह्यात कुठल्या पदाच्या किती जागा?
पोलिस शिपाई पदाच्या १५० जागा आहेत. तर बँड्समन पदाच्या ११ जागा आहेत. त्यासाठी येत्या काळात भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील युवकांनी वर्षभरापासून पदभरतीसाठीची तयार केली आहे. आता कार्यक्रम कधी लागतो, याची प्रतीक्षा आहे.
५० गुणांची फिजिकल, १०० गुणांची लेखी परीक्षा
पोलिस भरतीसाठी मोठ्या संख्येत तरुण तयारी करत आहेत. मैदानी क्षमतेसोबतच लेखी परीक्षेतही आऊट ऑफ गुण कसे मिळतील, यासाठी प्रयत्न केले जातात. तरुण सकाळी व सायंकाळी मैदानावर घाम गाळतात. तर उरल्या वेळेत अभ्यासिकेत लेखी परीक्षेची तयारी करतात.
१६१ जागांवर पोलिस भरती
पोलिस दलात रिक्त असलेल्या जागांचा अहवाल गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्या जागेवर पदभरती घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. पदभरतीबाबत शासनस्तरावरूनच कार्यक्रम दिला जाणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिस दलातील प्रवर्गनिहाय रिक्त जागेचा अहवाल गृह विभागाकडे दिला आहे. त्यांच्या निर्देशानुसारच पदभरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. निर्देश येताच पदभरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
कुमार चिंता, पोलिस अधीक्षक, यवतमाळ
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा